वैभववाडी
संपूर्ण जगभरात सहित वैभववाडी तालुक्यात देखील कोरोनाने थैमान घातला आहे अशा परिस्थितीमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला असून त्यात आपल्या जवळचे नातेवाईक, मित्र, सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक, राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक यांनासुद्धा जीव गमवावा लागला त्यामुळे यावर्षी लग्न वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय नवलराज काळे यांनी घेतला. त्या खर्चामध्ये गावात कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्या ग्रामपंचायतीतील कर्मचारी आरोग्य विभागातील कर्मचारी अविरहीतपने जनतेला सेवा देत आहेत. त्या सेवा देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात N95 मास्कचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी लग्न वाढदिवसाचे औचित्य साधून सलग दोन वर्ष जपली सामाजिक बांधिलकी, गेल्या वर्षी देखील 04 मे 2020 रोजी काळे यांनी गावात कोरोना विरुद्ध काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस पोलीस पाटील, कोतवाल ग्रामपंचायत कर्मचारी यांना सनकोट(ॲप्रोन) व हॅट चे वाटप केले होते. तसेच या वर्षी देखील नवलराज काळे यांनी 04 मे 2021 रोजी लग्न वाढदिवसाचे औचित्य साधून N 95 चे वाटप केले.
यावेळी श्री माऊली चॅरीटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग चे सचिव कथा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड. विक्रमसिंह विजयसिंह काळे, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रशांत जाधव, सडूरे शिराळे चे सरपंच संतोष पाटील, अरूळे गावचे सरपंच सौ सविता कदम, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका बंडगर, आरोग्य सेविका शितल चाफे, वैशाली रावराणे, दीपिका भावे, हरियाण सिस्टर, अशोक पाटील आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे व माऊली चारीटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेला स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.