विजयराव नाईक फार्मसी कॉलेज कोविड सेंटरलाही दिली भेट…
कणकवली
जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकार प्रजित नायर यांनी आज कणकवली उपजिल्हा रुग्णालय व शिरवल येथील कोविड केअर सेंटरची पाहणी करून कोविड रुग्णांच्या सुविधा बाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी आमदार वैभव नाईक व अधिकाऱ्यांशी संवाद साधत रुग्णांना देण्यात येणारी सेवा व कमी पडत असलेल्या बाबींवर चर्चा करत माहिती घेतली.
यावेळी श्री.नायर यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकार्यांशी तातडीने चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याशी चर्चा करून रुग्ण सेवेबाबत येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी अभिजीत हजारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, आरोग्य विभागाचे प्रशांत बुचडे उपस्थित होते.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डीसीएचसी सेंटर मधील बेड ला पुरेसा ऑक्सीजन आहे का? याबाबत आढावा घेतला. त्यावेळी आरोग्य विभागाकडून कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डी सी एच सी मध्ये एकूण १० बेड असून, त्यातील ६ बेड हे ऑक्सिजनचे व ४ बेड व्हेंटिलेटर चे आहेत. मात्र व्हेंटिलेटर चा वापर हा अतिगंभीर रुग्णांसाठी होतो. त्यामुळे ऑक्सिजनचे बेड व पुरवठा वाढविण्याची गरज असल्याचे मत आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आले. त्यावर श्री नायर यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याशी चर्चा करून पुरेसा ऑक्सिजनसाठा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला देण्याबाबत चर्चा करण्यात येईल असे श्री नायर यांनी सांगितले. तसेच यावेळी रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधाबाबतही श्री नायर यांनी आढावा घेतला. लसीकरण सेंटर बाबतही त्यांनी माहिती घेतली. तसेच शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज मध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरची श्री नायर व अधिकाऱ्यांनी पाहणी करून तेथील कोरोना च्या रुग्ण सुविधेबाबत आढावा घेतला. व श्री नायर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.