एक एक करून माणसं दूर जातात,
आशा अपेक्षा घेऊन आपल्याच तळ हातात.
भावना दुखावतात, मनं सुन्न होतात,
भोवतालची दुःखही जमतात आपल्या खात्यात.
पाण्याने भरलेली ओंजळ सुद्धा,
रीती होतेच नसतं काहीच त्यांच्या नात्यात.
कोण खरं सांगतंय कोण खोटं बोलतंय,
विज्ञानही आलंय वाटतंय आजकाल गोत्यात.
हृदयातल्या देवाला मनोमन साकडे घालतात,
अडचणीत माणसाला देवही भेटत नाही नेत्यात.
परमेश्वराच्या धनुष्यातून सुटले तेज बाण,
कसे पाहू मी तरी किती उरतात त्याच्या भात्यात.
आयुष्याचा शर्यतीत स्पर्धकच हरतात,
हार-जित नफाच जणू नसतात कधी तोट्यात.
(दिपी)✒️
दीपक पटेकर.
८४४६७४३१९६