बांदा प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व शिक्षक व शाळांविषयी घरातूनच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी Thank a Teacher या अभियानांतर्गत बांदा केंद्रशाळेच्या वतीने गटवार आँनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला या स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत.
गट – १ ली ते २ री विषय : गुच्छ तयार करणे स्पर्धा सर्वोत्कृष्ट : दत्तराज नरसिंह काणेकर भेटकार्ड स्पर्धा सर्वोत्कृष्ट :नैतिक निलेश मोरजकर, शैक्षणिक रांगोळी सर्वोत्तम : सिमरन सुधीर तेंडोलकर.
या स्पर्धांचे परीक्षण प्राथमिक शिक्षक हंसराज गवळे इन्सुली, युवराज पचकर वैभववाडी, स्वाती पाटील कास, प्रणिता भोयर माजगाव यांनी केले.
ही आॅनलाईन स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी बांदा शाळेतील उपशिक्षक जे.डी पाटील, रंगनाथ परब, उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे, जागृती धुरी, प्राजक्ता पाटील यांनी परीश्रम घेतले. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सरोज नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्षा सविता किल्लेदार, बांदा सरपंच अक्रम खान, केंद्रप्रमुख संदिप गवस, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले आहे. सध्या कोरोनामुळे महामारीमुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या कृतीशिलतेला वाव देण्यासाठी शाळेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या आॅनलाईन स्पर्धात्मक उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.