मुख्यमंत्र्यांना दोडामार्ग पञकार संघाचे निवेदन
दोडामार्ग
कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पञकारांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील दूर्लक्ष केले जात आहे त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दोडामार्ग तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना याबाबबतचे निवेदन दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांना सादर करुन ते मुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचवावे असे सांगितले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ दोडामार्ग यांच्या वतीने शनिवारी .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात महाराष्ट्र राज्यात तसेच जिल्हा तालुका ग्रामिण भागात कोरोना काळात पञकारांना भेडसावणाऱ्या समस्या याकडे लक्ष वेधण्यात आले.
दोडामार्ग तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ दोडामार्ग यांच्या वतीने आपणास निवेदन देत आहोत गेल्या वर्षापासून महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचे दूष्टचक्र यांनी थैमान घातले आहे. या कोरोना काळात लोकात जनजागृती करण्याचे काम व पञकार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.
गेल्या काही वर्षांत काम करत असताना अनेक पञकारांना कोरोनाची लागण झाली.काही जणांना जीव गमवावा लागला.तर काहीजण बरे होऊन घरी परतले पुन्हा काम सुरू केले.
पञकार मंडळी यांना किरकोळ मानधनावर काम करावे लागते सरकारी अधिकारी कर्मचारी यांना लाखो रुपये सरकारी मानधन दिले जाते.पण शासनाकडून पञकार मंडळी यांना पेन्शन योजना, तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी अनेक वेळा सरकारकडे मागणी करुन देखील राज्य सरकारने पञकारांच्या मागण्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केलेला नाही त्यामुळे आज अनेक पञकारांना मोठ्या संकटातून जावे लागत आहे.
कोरोना विषणूच्या पाश्र्वभूमीवर पञकार मंडळी फिल्डवर जाऊन काम करतात.कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे.यात अनेक पञकार याचे बळी ठरत आहेत.कोरोनाची लागण झालेल्या पञकाराच्या उपचारासाठी येणारा खर्च ही रक्कम पण नसते. त्यामुळे तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या पञकारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत पण सरकार कडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत दिली जात नाही.
तेव्हा मुख्यमंत्री महोदय आमची आपल्याला विनंती आहे.कोरोना काळात वृत्तपञात सोशल मीडिया मध्ये काम करणाऱ्या सर्व पञकाराचे विमा पॉलिसी शासनाने उतरावी,२५ ते ३० वर्षांपासून काम करणाऱ्या पञकारांना शासनाने पेन्शन योजना लागू करावी.कोरोना काळात आर्थिक मदत दिली जावी कोरोना काळात ज्या पञकारांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी.तरी या निवेदनाचा जाणीवपूर्वक विचार करून पञकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनात केली आहे.