You are currently viewing जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीईओंकडून मालवणच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीईओंकडून मालवणच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा

मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात लसीकरण केंद्राला मंजुरी

मालवण :

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी शनिवारी सायंकाळी मालवणला भेट देऊन आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी येथील मामा वरेरकर नाट्यगृहातील लसीकरण केंद्राला जिल्हाधिकारी श्रीमती मंजूलक्ष्मी यांनी मंजुरी दिली आहे.
यावेळी तहसीलदार अजय पाटणे, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी पाटील, तालूका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, डॉ. सुरज बांगर, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरसह ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी तालूका प्रशासन आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून लसीकरण कार्यक्रमातील अडचणी जाणून घेतल्या. ग्रामीण रुग्णालयाची जागा अपुरी असल्याने याठिकाणी लसीकरणावेळी मोठी गर्दी होते. कोरोना महामारीच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याने मामा वरेरकर नाट्यगृहातील लसीकरण केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. येत्या दोन-तीन दिवसांत याठिकाणी लसीकरण सुरू करण्यात येणार असून याचा रीतसर कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा