You are currently viewing सूर्याची कमाल मिळाला करोडपतीचा मान.

सूर्याची कमाल मिळाला करोडपतीचा मान.

इन्सुली, वेत्ये, सोनूर्ली येथील काळ्या दगडांच्या खाणींमध्ये बेकायदेशीर उत्खनन केले जात आहे.
गोवा राज्यात मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतूक केली जात असून महाराष्ट्र सरकारचा करोडो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे.
सुर्या नामक व्यक्ती आरटीओ अधिकाऱ्यांसाठी गाडी मालकांकडून पैसे वसुलीचे काम करतो.
आरटीओ अधिकाऱ्यांसाठी रस्त्यावर उभा राहून पैसे गोळा करणारा सुर्या आहे 3 कोटींचा मालक.
सुर्या जर पैसे गोळा करता करता करोडपतीचा मान मिळवतो म्हणजे आरटीओ अधिकारी किती माया गोळा करत असतील?
शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या तक्रारीनंतर सुर्या काही दिवस मावळला होता, पुन्हा झाला रुजू पैसे गोळा करण्यासाठी.
पैशांनी महसूल आणि आरटीओ अधिकाऱ्यांना विकत घेतलेले खाण मालक गाववाल्याना नाही भीक घालत.
गावातील कित्येक घरांना गेलेत तडे, तक्रारदारांना अधिकारी नाही जुमानत. महेश सावंत यांनी तक्रार केल्यावर काही काळ केली होती ओव्हरलोड वाहतूक बंद.
संवाद मीडियाने दखल घेत चित्रीकरण सुरू केल्यावर अधिकाऱ्यांनी सूचना करून पत्रकार आलेत, वाहतूक बंद ठेवा अशा सूचना केल्या होत्या.
चित्रीकरण करत असताना तिथे उभी असलेली मोटारसायकल एक आरटीओ कर्मचारी लपवून ठेवत होता, ती मोटारसायकल सुर्या या आरटीओ च्या कलेक्टर ची असल्याची माहिती संवाद मीडियाला मिळाली.
सरकारचा खजिना भरण्यापेक्षा आपली पोतडी भरणाऱ्या महसूल आणि आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?
बेकायदेशीर होणारी काळ्या दगडाची आणि खडीच्या वाहतुकीवर कारवाई होणार की नाही? असा सवाल उपस्थित होतोय…..

प्रतिक्रिया व्यक्त करा