You are currently viewing अणसुर जैन ब्राम्हण मंदिर रस्त्याचे भूमिपूजन

अणसुर जैन ब्राम्हण मंदिर रस्त्याचे भूमिपूजन

वेंगुर्ले

अणसुर जैन ब्राम्हण मंदिर येथील रस्त्याचे भूमिपूजन जेष्ठ नागरिक यशवंत उर्फ बाबल गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
अणसुर, रामघाट, भेंडमळा, परबवाडा तसेच वेंगुर्ला परिसरातील लोकांचे श्रध्दा स्थान असलेल्या जैन ब्राम्हण मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अणसुर गावच्या सरपंच सौ. अन्वीता गावडे, उपसरपंच संजय गावडे, ग्रा. सदस्य श्वेता गावडे, परबवाडा ग्रा. सदस्य हेमंत गावडे, रंगनाथ गावडे, गोपी गावडे, आनंद गावडे, भास्कर गावडे, विकी गवंडे, सागर गावडे, दादा पेडणेकर, अक्षय गावडे, दर्शन आंगचेकर उपस्थित होते.

या रस्त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, शिवसेना तालुका प्रमुख बाळू परब यांनी निधी उपलबद्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल उपतालुका प्रमुख संजय गावडे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा