You are currently viewing मराठा आरक्षण निर्णयावर मुखमंत्र्यांची बैठक…

मराठा आरक्षण निर्णयावर मुखमंत्र्यांची बैठक…

मुंबई
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत पुढील रणनीती ठरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गुरुवारी बैठक झाली सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्यास स्थगिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा हा अंतरिम आदेश आहे.म्हणून अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला संयम बाळगायला सांगितले आहे.कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये संयम बाळगावा अशी विनंती केली.
काही मंडळी मराठा समजाची दिशाभूल करतायत.मराठा सामजने संतापून कायदा हातात घ्यावा आणि सर्वोच्य न्यायालयात मनाठा समजा बद्दल चुकीची प्रतिमा निर्माण व्हावी या करता षडयंत्र रचले जात आहे.
समाजाने हे कारस्थान ओळखण्याची आणि ते मोडून काढण्याची गरज आहे असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण ,एकनाथ शिंदे,बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील,संसदीय कामकाज मंत्री,राज्याचे महाधिवक्ता,विधी विभागाचे सचिव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा