बांदा
बांदा:कोरोनाच्या लॉक डाऊन काळात सर्वसामान्य लोकांच्या जेवणाचे हाल होऊ नये म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून शिवभोजन थाळी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यातही हा उपक्रम सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.त्याच योजनेचा लाभ बांदा शहर व परिसरातील गरजूंना मिळावा यासाठी बांदा कट्टा कॉर्नर येथे उद्या(ता.१ मे)पासून शिवभोजन थाळी केंद्र सुरू होत असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी बांदा येथील पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बांदा शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर, विभागप्रमुख राजेश विरनोडकर, सुशांत पांगम, भैया गोवेकर, हनुमंत सावंत, ओंकार नाडकर्णी आदि उपस्थित होते.
तालुकाप्रमुख रुपेश राऊळ म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्य जनता ही लोकप्रिय आहे. त्यामुळे त्यांचे कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नये म्हणून गतवर्षी लॉक डाऊन काळात गरजूंसाठी शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली होती. याच अनुषंगाने बांद्यात ही शिवभोजन थाळी उद्यापासून सुरू होणार असून सुमारे १०० गरजूंना याचा लाभ मिळणार आहे. शिवसेना बांदा शहर पदाधिकारी या योजनेसाठी कार्यरत राहणार असून बांदा कट्टा कॉर्नर येथील उदय येडवे यांच्या हॉटेलनजीक हे केंद्र सुरू होणार असून याचा बांदा शहर परिसरातील गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री.राऊळ यांनी केले. उद्या या शिवभोजन केंद्राला खा.विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.