मनसे राज्य परिवहन कामगार सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अँड.दुर्गाप्रसाद उर्फ राजू कासकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी एसटी स्टँड कोरोना प्रतिबंधक फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. स्वराज्य संघटना सावंतवाडी व संजू विरनोडकर टिंम तर्फे हा उपक्रम राबवून राजू कासकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सायंकाळी सहा ते नऊ पर्यंत चाललेल्या फवारणीत स्वतः राजू कासकर यानी संपुर्ण कोविड प्रतिबंधक फवारणी करून आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला वाढदिवस. कोरोनाच्या महामारीतही जिल्हात जी परिस्थिती निर्माण झाली अश्या वेळी केक न कापता नागरी हिताचा उपक्रम करावा हि संकल्पना संजू विरनोडकर यानी माडली व त्याप्रमाणे स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते व संजू विरनोडकर टिम च्या वतीने हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली असे राजू कासकर म्हणाले.
यावेळी एसटी स्टँड, प्रवाशांची बसण्याचे बेंच, कंट्रोल रूम, पार्सल विभाग, अधिकारी कक्ष, एसटी दुरूस्त करण्याचा विभाख, बाहेररून आलेल्या वाहक, चालक यांची रेस्ट रूम, पोलिस कंट्रोल कक्ष अश्या सर्व ठिकाणी निर्जंतुककीकरण करण्यात आले. या प्रसंगी डेपो मॅनेजर व एसटी कर्मचारी व कार्यकर्ते यानी राजू कासकर याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून सामाजिक उपक्रमा बद्दल धन्यवाद दिले.