You are currently viewing सावंतवाडीतील व्यापाऱ्यांना कळकळीचे आवाहन

सावंतवाडीतील व्यापाऱ्यांना कळकळीचे आवाहन

सावंतवाडी
व्यापारी वर्गाने शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोना मुक्त होण्यासाठी सहकार्य करण्याचे कळकळीचे आवाहन सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी केलें आहे.
देशात करोना महामारीने थैमान घातले आहे. महाराष्ट राज्य त्यात आघाडीवर आहे. आपल्या जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ चिंताजनक आहे. सावंतवाडी तालुक्यातील व शहरातील करोना रुगण वाढ झपाट्याने वाढत आहे . करोना बाबत व्यापारी, उद्योजक , व व्यावसायिक आणि ग्राहकांना विषयाचं गांभीर्य नाही हे वास्तव आहे.प्रत्येक वार्डातील करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. गेले वर्षभर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.रोज व्यवसाय करणारे, भाजी, फुलं, फळे विकणारे तसेच सलुन व लाॅड्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. इतर कापड, स्टेशनरी, हाॅटेल, कोल्ड्रींक, रेडीमेड, इलेक्ट्रॉनिकस्, इलेक्ट्रीकलस्, लाकडी खेळणी, फर्नीचर, यांचे व्यावसाय ठप्प झाले आहेत. आपल्या बरोबर या व्यवसायिकांचाही विचार करण्याची गरज आहे. आपण अत्यावश्यक सेवे अंतर्गत जे व्यवसाय करतात त्यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. पण काही व्यवसायिक कुठल्याही नियमांचे पालन करतात दिसत नाहीत अशा प्रशासनाकडून तक्रारी आल्या आहेत. सावंतवाडी शहरात एका व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. हे सावंतवाडी शहराला भुषणावाह नाही. आपले व्यवसाय व आस्थापने नियमांचे पालन काटेकोरपणे करा. हाॅटेल व्यवसायिक यांना फक्त घरपोच सेवा करण्याची मुभा दिलेली आहे. परंतु काही हाॅटेल मधून ग्राहकांना हाॅटेल मध्ये बसून खाण्याचे पदार्थ दिले जातात. प्रशासनाकडून या विषयी कडक कारवाई करण्यात येईल असे निर्देश देण्यात आले आहेत. तशा सुचना देण्यात आल्या आहेत. कृपया प्रत्येकाने नियम पाळुन व्यवसाय करावा. ज्यांना नियमानुसार परवानगी दिली आहेत त्यांनीच आपले व्यवसाय सूरू ठेवावेत नाहितर कारवाई ला सामोरे जावं लागेलच याचा गांभीर्य पणे विचार करावा .आपण सुज्ञ नागरिक म्हणून वावरत आहात यांचे भान ठेवावे. जगण्यासाठी व्यवसाय केला पाहिजे हे मान्य आहे. त्या पेक्षा जगणं महत्वाचे आहे. प्रत्येकजण करोना महामारी कारणाने आर्थिक अडचणीत आलेला आहे. हे दिवसही जातील .आपण आपल्या कुटुंबातील आधारस्तंभ आहात, आपणं जगणं आपले आई-वडील, भाऊ बहिण , पत्नी मुलं, मित्र, नातेवाईक यांना गरजेचे आहे. आपण आपलीं व कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घ्यावी. ग्राहक आपलं दैवतं आहे. त्याच्याशी संबंधितांशी सुरक्षित अंतर ठेवून व्यवसाय करावा. नियमांच पालन करा.असे कळकळीचे आवाहन जगदीश मांजरेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा