You are currently viewing आ. दिपक केसरकर, आ. वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून लवकरच १ हजार रेमडेसिवीर

आ. दिपक केसरकर, आ. वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून लवकरच १ हजार रेमडेसिवीर

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासमवेत कोविड उपाययोजनां संदर्भात चर्चा

जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी शिवसेना आमदार दिपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनी प्रत्येकी ५०० अशा एकूण १ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी आपल्या आमदार फंडातून निधी दिला आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला असून लवकरच या निधीतून १ हजार रेमडेसिवीर उपलब्ध करण्यात येणार आहेत.
ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासमवेत आ. दिपक केसरकर, आ. वैभव नाईक यांनी बैठक घेऊन कोविड उपाययोजनां संदर्भात चर्चा केली व आवश्यक सूचना केल्या. कोरोनामुळे वेंगुर्ले येथील स्टाफ नर्स, व नगरपालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला त्यांचे कोरोना योद्धा म्हणून प्रस्ताव राज्य शासनाकडे लवकरात लवकर पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या.
तसेच सिंधुदुर्गात रॅपिड टेस्ट करण्यासाठी टेस्ट किट कमी पडत आहेत त्याची उपलब्धता करण्यात यावी. जिल्ह्यात लसीकरण केंद्रांवर लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असून हि गर्दी टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याबाबत नियोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधवळे, व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा