नीलक्रांती मत्स्य पर्यटन व कृषी सहकारी संस्थेचा उपक्रम ; रुग्णांवर होणार मोफत उपचार
मालवण
निलक्रांती संस्थेने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या जिल्ह्यातील पहिल्या खासगी कोरोना केअर सेंटरला मान्यता मिळाली आहे. या केंद्रात १२ रुग्णांची व्यवस्था होणार असून त्यासाठी लागणारे वैद्यकीय मार्गदर्शन रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर पुरविणार आहे. गुरुवारी २९ एप्रिल रोजी या केंद्राचे उद्घाटन आम. वैभव नाईक यांच्या हस्ते व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलीपे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
जिल्ह्यातील खाजगी संस्था सामाजिक बांधिलकी म्हणून पुढाकार घेऊन कोरोना प्रसार थांबण्यासाठी अश्या प्रकारच्या उपक्रमासाठी पुढे याव्यात असे आवाहन नीलक्रांती मत्स्य पर्यटन व कृषी सहकारी संस्था, मालवणचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी केले आहे.