कोरोना संकटाला प्रत्येकाला सामोरे जावे लागते आहे. यात कोणीही वाचला नाही, त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेल्या गोवा राज्यात नोकरी निमित्त असलेल्या युवावर्गाची गेले दोन दिवस संचारबंदी मुळे नोकरीला ये जा करण्यासाठी मोठी तारांबळ उडाली होती यात योग्य निर्णय न मिळाल्याने युवावर्गात कोरोना आणि आता या गडबडीत नोकरी गमवावी लागते की काय याची काळजी भासु लागली होती. रविवार असुनही गोवा राज्याच्या जवळ असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीतील सातार्डा चेकपोस्ट वर नोकरी निमित्त जाणाऱ्या युवकांची गर्दी झाली. काय करावे हे समजत नव्हते तेवढ्यात तेथे शिवसेना कार्यकर्ते सुधाकर कवठणकर आपल्या कार्यकर्त्यांसोबत पोचले योगायोगाने सावंतवाडी तालुका पत्रकार आणि LIC मध्ये कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते संजय पिळणकर पण त्याठिकाणी आले आणि तोडगा काढण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करू लागले, काय तरी तोडगा काढावा या तळमळीने सुधा कवठणकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर यांच्याशी चर्चा झाली.
सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांच्याशी बोलून गोवा राज्यात नोकरी निमित्त जाणाऱ्या प्रत्येकाला त्यांना ग्रामपंचायत दाखला घेऊन आणि चेकपोस्ट वर थर्मल गनच्या सहाय्याने तपासणी करून ये जा करण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी विचार व्हावा असे सांगून, त्यांच्या करवी निर्णय घेतला.