You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या हस्ते कोरोना योध्यांचा सन्मान…

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते कोरोना योध्यांचा सन्मान…

श्री खवळे महागणपती ट्रस्टचा कोरोना योद्धा सन्मान सोहळा

देवगड प्रतिनिधी :-

तारामुंबरी येथील श्री खवळे महागणपती ट्रस्ट च्या मार्फत पारंपारिक गणेशोत्सवातील सांस्कृतिक, उपक्रम न करता कोरोना संक्रमण काळात शासन प्रशासन यांचे आदेश पाळीत उत्सव साजरा केला आणि कोरोना संक्रमण काळात महत्वपूर्ण कामगिरी बजाविणारे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते पत्रकार यांचा जो सन्मान केला हा सामाजिक उपक्रम निश्चितपणे कौतुकास्पद व भूषणावह आहे.  या पुढील काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाचे संकट श्री खवळे महागणपती दूर करेल व येथील सर्व नागरिकांचे आरोग्य सुधारेल असा आत्मविश्वास आम. वैभव नाईक यांनी तारामुंबरी येथे श्री खवळे महागणपती ट्रस्टच्या कोरोना योद्धा सन्मान सोहळ्यात बोलताना व्यक्त केला.

तारामुंबरी येथील श्री खवळे महागणपती ट्रस्ट च्या वतीने कोरोना संक्रमण काळात विशेष महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या अधिकारी, व कार्यकर्ते यांचा कोरोना योध्दा सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष प्रणाली माने, तालुका प्रमुख विलास साळसकर, शहर अध्यक्ष संतोष तारी, लक्ष्मण तारी, नितीन राऊळ,  संतोष साटम ट्रस्टचे विश्वस्त सुर्यकांत खवळे, अरविंद खवळे, अण्णा खवळे, दिनेश खवळे चंद्रकांत खवळे, अमेय खवळे व अन्य मान्यवर उपस्थित होते. कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात नगराध्यक्ष प्रणाली माने, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहा.पोलीस निरीक्षक संजय कातीवले, वैद्यकीय अधिकारी संदीप भगत नगरसेवक नीरज घाडी, रामेश्वर प्रतिष्ठांन अध्यक्ष भाई नरे, पत्रकार दयानंद मांगले, प्रशांत वाडेकर, नगरपंचायत कर्मचारी शिवप्रसाद गावकर, भास्कर राऊळ, परिचारिका राजश्री खवळे, पोलीस पाटील तन्वी खवळे यांचा समावेश होता. या गणेशोत्सव कोरोना योद्धा सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आम.वैभव नाईक यांचाही विशेष सन्मान शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. देवगड तालुक्यातील गणेशभक्तांबरोबर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड व अन्य भागातील नागरिकांनीही दर्शन घेतले या गणरायाचे विसर्जन तारामुंबरी येथील समुद्रकिनारी पारंपारिक पद्धतीने शासन प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा