You are currently viewing संभाव्य रक्त टंचाई होऊ नये या करिता भाजपा, ओरोस मंडल आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन

संभाव्य रक्त टंचाई होऊ नये या करिता भाजपा, ओरोस मंडल आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन

१ मे पासुन १८ वर्षावरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार. अशी घोषणा नुकतीच पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यामुळे भारत देश कोरोनामुक्ती कडे आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे.परंतु जेव्हा 18 ते 45 या वयोगटातील तरुण लसीकरण करून घेणार आहेत तेव्हा या लसीकरण झालेल्या तरुणांना लस घेतल्यानंतर साधारणतः 45 दिवस ते 60 दिवसापर्यंत रक्तदान किंवा प्लाझ्मादान करता येणार नाही. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात रक्ताची प्रचंड टंचाई निर्माण होणार आहे.त्यामुळे अशी संभाव्य रक्त टंचाई होऊ नये या करिता भाजपा, ओरोस मंडल आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 15 दिवसात कुडाळ तालुक्यात किमान 6 रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.कृपया १८ वर्षावरील मित्रांना विनंती आहे की रक्तदान, प्लाझ्मादान करुन मगच लसिकरण करून घ्यावे.

नियोजित रक्तदान शिबिर..

दिनांक 27 एप्रिल – पणदूर

दिनांक 30 एप्रिल – आवळेगाव

दिनांक 03 मे – घोटगे/जांभवडे.

प्रतिक्रिया व्यक्त करा