You are currently viewing रांगणा गड पायथ्याच्या जंगलातील ऐतिहासिक तोफा संवर्धन मोहीम

रांगणा गड पायथ्याच्या जंगलातील ऐतिहासिक तोफा संवर्धन मोहीम

सिंधुदूर्ग :

दिनांक २१ एप्रिल २०२१ रामनवमी दिवशी दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागच्या मावळे रांगणा गड पायथ्याच्या जंगलातील तिसऱ्या ऐतिहासिक तोफेपर्यंत पोहचले होते.

ही तोफ वर आणण्यासाठी त्रिवेणी ग्रुप कागल यांनी दिनांक २४ व २५ एप्रिल २०२१ रोजी राबविलेल्या संवर्धन मोहिमेत आज दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागचे अध्यक्ष गणेश नाईक, सावंतवाडी तालुका सरचिटणीस सच्छिदानंद राऊळ, तानाजी कुंभार, समीर धोंड व रोहन राऊळ इत्यादी मावळ्यांनी सहभाग घेऊन या संवर्धन मोहिमेत खारीचा वाटा उचलला.

या संवर्धन मोहिमेसाठी त्रिवेणी ग्रुप कागलच्या सुमारे १५ मावळ्यांनी तहान भूक हरपून खूप मेहनत घेतली. त्यांच्या कार्याला दुर्ग मावळा परिवाराचा सलाम  !!!

प्रतिक्रिया व्यक्त करा