दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला येथील युवकांना ई-पासची मिळणार मुभा…
सावंतवाडी
गोव्यात नोकरीसाठी जाणाऱ्यांना ई- पासची गरज नाही आहे. स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जाणार असून, येत्या तीन दिवसात यावर तोडगा काढण्यात येणार असून, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकारी मंजुलक्षमी यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे. तोपर्यंत तीन दिवस गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्यांना मुभा दिली जाणार आहे. त्यामुळे त्या मुलांनी संभ्रमात पडू नये, शिवसेना मुलांच्या रोजगाराला धक्का लागू देणार नाही. याची जबाबदारी शिवसेना घेणार आहे. अशी माहिती सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली आहे. तसेच याबाबत पालकमंत्री यांच्या माध्यमातून त्यांनी एसपी शी देखील चर्चा केली असून, एसपी नी ही याबाबत तयारी दर्शवली आहे.