You are currently viewing आमदार नितेश राणे यांनी दिले आपल्या मतदारसंघात छोटे ऑक्सीजन सिलेंडर

आमदार नितेश राणे यांनी दिले आपल्या मतदारसंघात छोटे ऑक्सीजन सिलेंडर

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचा जीव वाचवण्यात येणार यश

कणकवली :

कोरोना झाल्यावर शरीरातील ऑक्सिजन कमी होतो. यामध्ये त्याचा मृत्यूही होऊ शकतो.या आपत्कालीन परिस्थितीमध्ये ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आमदार नितेश राणे यांनी शंभर छोटे ऑक्सिजनचे सिलेंडर कणकवली मतदार संघासाठी उपलब्ध करून दिले आहेत.

हे ऑक्सिजनचे सिलेंडर कोणत्याही तज्ञा शिवाय माणसाला वापरता येतात. एखाद्या स्प्रेसाठी वापरतात तेवढा सिलेंडर यासाठी वापरात आणला आहे. यामुळे माणसाचा जीव वाचतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णाला ऑक्सिजन मिळत नाही. यावेळी प्रथमोपचारासाठी या सिलेंडरचा उपयोग करता येतो. पुढील वैद्यकीय मदत मिळेपर्यंत या सिलेंडरच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णाला होऊ शकतो. व रुग्णाचा जीव वाचतो.

आमदार नितेश राणे यांनी देवगडसाठीही बेड पाठवले असून, हे बेड आज देवगड येथील कोविड केअर सेंटर मध्ये पोहोचले. यामुळे कणकवली मतदार संघामध्ये प्राथमिक अवस्थेत सुमारे 75 बेड कोरोना ग्रस्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आमदार नितेश राणे यांनी ही सुविधा निर्माण केल्याने आरोग्य यंत्रणेला रुग्णाला वाचवण्यात फार मोठे यश येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा