कृषी विज्ञान केंद्र , किर्लोस, मालवण, सिंधुदुर्ग व रिलायन्स फाउंडेशन सिंधुदुर्ग च्या सयुक्त विद्यमाने खरीप भात लागवडीबद्दल, व COVID-19 च्या अनुषंगाने ध्वनी चर्चा सत्राद्वारे (ऑडिओ कॉन्फरेन्स ) शेतकऱ्यांना घरबसल्या मार्गदर्शन करण्यात आले.
खरीप भात लागवडीच्या अनुषंगाने करोना पार्शवभूमीवर खरीप भात शेतीचे नियोजन कसे करावे यासाठी कृषी विज्ञान केंद्र , किर्लोस, मालवण सिंधुदुर्ग व रीलायन्स फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या सयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञांनाच्या ध्वनी चर्चा सत्राद्वारे घरबसल्या मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ . भास्कर काजरेकर, वरिष्ठ शाश्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र , किर्लोस, मालवण सिंधुदुर्ग यांनी शेतक-यांना खरिप भातशेतीबद्दल नियोजनाची ईत्यंभूतं माहिती दिली त्याचप्रमाणे विविध माध्यमातून शेतकऱ्यांनी माहिती मिळवून भात शेतीचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. पुढे मार्गदर्शन करताना काजरेकर सर यांनी कृषी विज्ञान केंद्र किर्लोस सिंधुदुर्ग हे शेतकऱ्यांचा पाठीशी मार्गदर्शन करण्यासाठी ठाम उभे आहे असे सांगितले.
या कार्यक्रमामध्ये डॉ. विवेक सावंत, शाश्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस सिंधुदुर्ग यांनी शेतऱ्यांना तण नियोजन, जमिनीची पेरणीपूर्व पूर्व मशागत, खत नियोजन, गादी वाफा नियोजन, पारंपरिक पेरणी व गादी वाफा तयार करून केलेली शेती याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले. डॉ. विलास सावंत, विस्तार अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र, यांनी कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मोलाचा मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांनी शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथे शेतकऱ्यांनी ९४२२४४९०१८ येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आव्हाहन केले.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन रिलायन्स फाउंडेशनचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक श्री राजेश कांबळे यांनी केले तसेच कार्यक्रमाची तांत्रीक बाजू रिलायन्स फाउंडेशनचे तेजस डोंगरीकर यांनी केले व नियोजन श्री. गणपत गावडे यांनी केले. शेतीविषयक, पशुपालनाविषयी तांत्रिक माहितीसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १८००४१९८८०० क्रमांकावर सकाळी ९.३० ते संध्याकाळी ७,३० वाजेपर्यंत ( रविवार सोडून) संपर्क साधण्याचे आव्हान रिलायन्स फाउंडेशन कडून करण्यात आले आहे . कार्यक्रमाला शेतकरी बंधू आणि भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.