जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला प्रतिसाद
सावंतवाडी
जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेची अर्थात किराणा तसेच भाजीपाला व अन्य खाद्य पदार्थांची दुकाने सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील या आदेशांचे सावंतवाडी शहरात काटेकोर पालन झालेले दिसून आले.
सावंतवाडी बाजारपेठेत सकाळीच खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती मात्र अकरानंतर शुकशुकाट पाहायला मिळाला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाबाबत व्यापारी वर्गातून मात्र तीव्र नाराजी दिसून आली.