You are currently viewing सावंतवाडीतील “वॉटर एटीएम” घोटाळ्याची महसूल मंत्र्यांकडे तक्रार करणार…

सावंतवाडीतील “वॉटर एटीएम” घोटाळ्याची महसूल मंत्र्यांकडे तक्रार करणार…

समीर वंजारी; कंपास पेटी व बेनामी गाळयांची संजू परब चौकशी करणार का..?

सावंतवाडी

येथील पालिकेच्या माध्यमातून घडलेल्या “वाॅटर एटीएम” घोटाळयाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महसूल मंत्र्यांकडे करण्यात येणार आहे,असा इशारा काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी दिला आहे. दरम्यान सावंतवाडीत कंपास पेटी व बेनामी गाळया संदर्भात नगराध्यक्षांना माहिती आहे, तर मग ते इतके दिवस गप्प का राहीले, आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा त्यांनी सखोल चौकशी करावी,अशी मागणी वंजारी यांनी केली आहे. हा सर्व प्रकार म्हणजे ‘तेरी भी चूप मेरी भी चुप’, असा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे. यात त्यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. सावंतवाडी शहरात घडलेल्या “वॉटर एटीएम” घोटाळ्या संदर्भात आपण लवकरच तक्रार करणार असून, नेमका प्रकार काय, हे जनतेसमोर आणणार आहे, असे ते म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा