महाराष्ट्रात वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य सरकारनं कडक निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय. राज्य सरकारनं आता बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडला ‘उत्पत्तीची संवेदनशील ठिकाणे म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणांहून प्रवास करणार्या प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी 48 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवालाची आवश्यकता असेल.
आज याबाबत राज्य सरकारकडून एसओपी जारी करण्यात आल्या आहेत.