You are currently viewing ICSE बोर्डाची परिक्षाही स्थगित…

ICSE बोर्डाची परिक्षाही स्थगित…

जूनमध्ये होणार अंतिम निर्णय

दिल्ली :

देशातील कोरोनाच्या वाढत्या संकटाचं सावट देशभरातील परीक्षांवरसुद्धा आहे. त्यामुळेच देशातील बहुतेक बोर्डांनी आपल्या परीक्षा रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत. CBSC बोर्डाने दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय जाहीर केल्यानंतर CISCE बोर्डाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान आता ICSE च्या दहावी-बारावीच्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत.

CISCE ने बारावी आणि दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्या आहे. या परीक्षा कधी होतील याबाबत आता माहिती देण्यात आली नाही आहे. जूनमध्ये याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात परीक्षांच्या नव्या तारखांबाबत अंतिम नर्णय घेतल्या जाईल, असं CISCE ने सांगितलं आहे.

CBSC बोर्डाने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत तर दहावीची परीक्षा रद्द केली आहे. 12वीच्या परीक्षा कधी घ्यायच्या यासंदर्भातील निर्णय 1 जून नंतर घेण्यात येणार आहे. त्यानंतर  CISCE ने ISCE च्या दहावी आणि बाराबीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं होतं.

सीआयएससीई बोर्डाच्या सध्या परीक्षा वेळापत्रकानुसार 10 वीची परीक्षा 4 मेपासून सुरू होणार होती तर 7 जूनला संपणार होती आणि 12 वीची परीक्षा 8 एप्रिलपासून सुरू झाली आहे, ती 18 जूनला संपेल. एक मार्चला बोर्डाने हे शेड्युल जारी केलं होतं.

गेल्यावर्षीसुद्धा कोरोना महासाथीमुळे सीआयएससीईच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पास केलं होतं. दहावीच्या विद्यार्थ्यांना इंटरनल असेसमेंटच्या आधारावर आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिल वर्कच्या आधारावर पास केलं गेलं होतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा