अकरावी प्रवेशांवर मराठा आरक्षण आदेशाचा परिणाम
मुंबई :
राज्यातील सहा महानगर क्षेत्रांतील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन (FYJC Online admission) पद्धतीने करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सुद्धा भरले. त्यानंतर ३० ऑगस्ट २०२० सायंकाळी अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.
मात्र आज गुरुवारी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार होती.
पण मराठा आरक्षणा बद्दल सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत लागू करण्यात आलेले सर्व लाभ रद्द करण्याचे अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारीत वेळापत्रक शासनाचे आदेश आल्यानंतर जाहीर करण्यात येईल, असे माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले आहे.म्हणून प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे