वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दि.११ एप्रिल म.ज्योतिबा फुले व दि.१४ एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती कोरोनाच्या नियमांचे पालन करुन प्रा.डॉ. एन व्ही. गवळी यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पूजन व हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर आणि म.ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन समाजातील प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन मानव मुक्तीचे महान कार्य केले. त्यांच्या विचारांच्या जागर करुन विचार आत्मसात केले पाहिजेत असे इतिहास विभाग प्रमुख प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी सांगितले. आपण थोर पुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोचवले पाहिजेत. राष्ट्र उभारणीत या दोघांचे विचार महत्त्वाचे आहेत असे प्रा.रमेश गुलदे यांनी सांगितले. आधुनिक समाजाच्या जडणघडणीत म.ज्योतिबा फुले व डाॕ.आंबेडकर यांचे कार्य महत्त्वाचे आहे. संविधानाच्या रुपाने डाॕ.आंबेडकरांनी देशाला खुप मोठी देणगी दिली आहे असे अध्यक्षीय भाषणात प्रा.डाॕ.एन व्ही.गवळी यांनी सांगितले. या आॕफलाईन कार्यक्रमाला प्रा.एस.एन.पाटील, प्रा.रमेश गुलदे, अधिक्षक श्री.संजय रावराणे, ग्रंथपाल श्री.के.एम.वाघमारे, प्रा.डाॕ.शिरगावकर, प्रा.विजय शिंदे, प्रा.हेदूळकर, प्रा.केशव पाखरे, प्रा.दिनेश बेटकर, प्रा.सत्यजित कांबळे, प्रा.राहूल भोसले व प्रा.प्रदीप ढेरे उपस्थित होते. या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राहुल भोसले यांनी मानले. तसेच ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये कु. प्रियांका वाडेकर, तेजस्वी रावराणे, डॉ.शिरगावकर, प्रा.केशव पाखरे, प्रा.विजय शिंदे व प्रा.डाॕ. एन व्ही गवळी यांनी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर व म.फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दिनेश बेटकर तर आभार प्रा.राहुल भोसले यांनी मानले.