You are currently viewing कोल्हापुरात उद्योगधंदे राहणार बंद

कोल्हापुरात उद्योगधंदे राहणार बंद

कोल्हापूर

देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटण्याने वाढत आहे. सध्या लोकांच्या जीवाला प्राधान्य दिले पाहिजे. व्हेंटिलेटर नाहीत, रेमडीसेव्हीअरचा तुटवडा जाणवत आहे. तसेच ऑक्‍सिजनचा पुरवठाही वेळेत झाला पाहिजे. या सर्वांची सांगड घातली पाहिजे. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योग आणि एमआयडीसी कारखाने पंधरा दिवस बंद राहतील. यासाठी उद्योजक आणि एमआयडीसीतील कारखानदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले. तसेच ज्या-त्या कारखान्यातील कामगारांना पन्नास टक्के पगारही द्यावा असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले आहे. उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

पालकमंत्री म्हणाले, दिवसें-दिवस कोल्हापुरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. या परिस्थितीला थोपवून ठेवण्यासाठी काही कठोर पण माणसांच्या जीवाचा विचार करणारे निर्णय घ्यावे लागत आहेत. अत्यावश्‍यक सेवेत जे कारखाने येतात. त्यांनीही खबरदारी घेवूनच कारखाने सुरु ठेवले पाहिजेत. तसेच कारखान्यातील सर्व कामगारांचे लसीकरण केले पाहिजे. पन्नास टक्के कामगार क्षमता ठेवून काम केले पाहिजे. इतर उद्योग बंद ठेवावे लागतील. आता लोकांच्या जीवनाचा विचार करावा लागले. यासाठी एमआयडीसीतील कारखानदार व उद्योजकांनी हा कारखाने बंद ठेवावेत. जे अत्यावश्‍यक सेवेत येतात असे कारखाने नियम पाळून सुरु राहितील. बाकीचे सर्व बंद ठेवावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा