You are currently viewing सावंतवाडीत तहसील कार्यालयासमोर काँग्रेसकडून भाजपाचा निषेध…

सावंतवाडीत तहसील कार्यालयासमोर काँग्रेसकडून भाजपाचा निषेध…

केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात कोरोना लसीचा कमी पुरवठा; जोरदार घोषणाबाजी…

सावंतवाडी

महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना लसीचे वाटप कमी प्रमाणात करणाऱ्या केंद्र सरकारचा आज जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.यावेळी येथील तहसीलदार कार्यालयासमोर मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, युवक जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष अँड.दिलीप नार्वेकर, जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख, सरचिटणीस महेंद्र सावंत, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरया, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष केतन कुमार गावडे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष जगन्नाथ डोंगरे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, कणकवलीचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, युवक कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर, मुंबई प्रांतिक सदस्य सुगंधा साटम, देवगड तालुका अध्यक्ष उल्हास मंचेकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, मालवण तालुका अध्यक्ष मेघनाद धुरी, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा