You are currently viewing राज्यात 14 किंवा 7 दिवसांचा लॉकडाऊन…

राज्यात 14 किंवा 7 दिवसांचा लॉकडाऊन…

 

दिवसेंदिवस राज्यात कोरोनाची परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, लॉकडाऊन 14 दिवसांचा असावा किंवा 7 दिवसांचा असावा यावर चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना टास्क फोर्ससोबत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये लॉकडाऊन किती दिवस लावावा यावर चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान दोन गट निर्माण झाले आहे.

कडक लॉकडाऊन सात दिवस करावे की 14 दिवस करावे यावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काहींच्या मते पहिल्यांदा सात दिवस लॉकडाऊन जाहीर करावे पण काहींचे मत जाहीर करताना 14 दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करावा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकंदरीत राज्यात 14 दिवस लॉकडाऊन लागणार हे मात्र निश्चित आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक शनिवारी पार पडली. कोरोना विषाणूची साखळी तोडायची असेल तर सलग 10 किंवा 21 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. या बैठकीत कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. ‘जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही’असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

‘कडक लॉकडाऊन पण जनतेचा उद्रेक यामध्ये मार्ग काढावा लागेल. थोडा वेळ सर्वांना कळ सोसावी लागेल. जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही. मी ज्या सर्वांशी चर्चा केली त्यांना सर्वांनी सहकार्य केलं व्यापारी उद्योजक. याला काही अवधी लागेल एक दोन दिवसात व्यापारांचा प्रश्नं सोडवू. नाहीतर सर्व काही सुरू ठेवा आणि जे काही अनर्थ ओढवेल त्याला सामोर जावं लागेल’ असं मुख्यमत्र्यांनी म्हटलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा