You are currently viewing महात्मा ज्योतीराव फुले

महात्मा ज्योतीराव फुले

 

 

गोऱ्हे कुळात जन्मूनी,

फुले नामे ज्यांस ओळखले.

जनतेनेच त्यांस प्रेरणेने,

महात्मा पद बहाल केले.

 

लेखक विचारवंत म्हणती,

समाजसुधारक ओळख बनली.

सत्यशोधक समाज संस्था,

ज्योतिरावांनी स्थापन केली.

 

शिक्षण जिथे घेणे कठीण,

स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली.

सावित्रीला साक्षर करुनी,

स्त्रियांची पहिली शाळा काढली.

 

स्पृश्य अस्पृश्य भेद मिटवूनी,

अस्पृश्यांना घरात पाणी दिले.

सुरुवात स्वतःपासून करुनी,

समाजास नवे वळण दाविले.

 

शेतकरी बहुजन समाज,

कार्यात अग्रस्थानी ठेवला.

मुली,दलित,रात्रशाळा असा,

शिक्षणाचा मजबूत पाया रोवला.

 

हंटर कमिशन पुढे मागणी,

सक्तीचे अन मोफत शिक्षण.

रूढी परंपरा अन अंधश्रद्धा,

दूर करुनी केले सार्थ जीवन.

 

सुधारणावादी विचार पसरण्या,

सुरू केले वृत्तपत्र दिनबंधू.

अशा थोर महात्म्याला आपण,

सारे मिळूनी शत शत वंदू.

 

(दिपी)✒️

दीपक पटेकर. सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा