माणसं भोंदू झाली म्हणून,
निर्माण झालेत बाबा…
विज्ञान युग पहा डोळेभरी,
भोंदूगिरीचा नको मिरवू टेंबा.
जंतरमंतर सर्वच थापा,
धुळफेकीचेच प्रकार सारे.
कितीदा तुम्ही फसणार यात,
कधीतरी उपाय शोधा ना रे.
कोंबडे कापून बकरे मारून,
मुके जीव जीवास मुकतात.
मेलेल्यातही असतो आत्मा.
जाणूनही कुठे लोक सुधारतात.
होम हवन अंगास राख,
बुवांसाठी कर्मकांड खास.
अंधश्रद्धेला घालून खतपाणी,
सत्कर्माचा करून देतात भास.
गोरगरीब सुख चैनीसाठी,
नेतेही लागतात भोंदूबाबांच्या नादी.
कसं संपणार हे पिक अंधश्रद्धेचं,
कि उगा दावायची अंगावरची खादी.