You are currently viewing बागायत ता.मालवण येथे ठाकरांच्या छोटू मोटू ची जुगाराची बैठक.

बागायत ता.मालवण येथे ठाकरांच्या छोटू मोटू ची जुगाराची बैठक.

राज्यभरात मिनी लॉकडाऊन सुरू असून भविष्यात पूर्ण लॉकडाऊन होणार ही भीती प्रत्येकाला सतावत असताना रोजीरोटीचे काय असे प्रश्न समोर उभे असताना मालवण तालुक्यातील बागायत येथील पेट्रोल पंपच्या समोर ठाकरांच्या छोट्या मोठ्या सहित परबांच्या मयग्याची अंदर बाहर जुगाराची बैठक आज संध्याकाळी ४.०० वाजल्यापासून मोठ्या दिमाखात सुरू आहे.
रस्त्यावर फिरणाऱ्या, घोळका करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना खाकी वर्दी आपला हिसका दाखवते तिथे मांडवली करून लॉकडाऊन मध्ये जुगाराच्या बैठका बसतातच कशा? बाजारपेठेत गर्दी होणार म्हणून अत्यावश्यक सामानाची दुकाने वगळून विक्रेत्यांना बंदी करण्यात येत आहे, सर्वसामान्य लोकांना खरेदीसाठी सुद्धा अडवणूक केली जाते, असे असताना शेकड्यात जुगाराची तकशीम चालवणाऱ्या छोट्या मोठ्या ठाकरांच्या बाबांचो झिला परबांच्या मयग्याच्या जुगाराच्या बैठका कशा बसवू दिल्या जातात असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत आहे.
गेल्या वेळी फणसगाव येथे झालेल्या बैठकीतील अनेक जण कोरोनाचे शिकार झाले होते, परिणामी जिल्ह्यात कोरोना फैलावण्यासही अशा बेकायदेशीर जुगाराच्या बैठका कारणीभूत ठरतात. परंतु सर्वसामान्यांवर कायद्याचा बडगा उगारणारे खाकी वर्दीवाले या बेकायदेशीर जुगाराच्या बैठकांना का पाठीशी घालतात? त्यातून खाकी वर्दीतील रखवालदारांना किती उत्पन्न मिळते? हा देखील संशोधनाचा विषय आहे, अन्यथा सर्वत्र निर्बंध असताना अशा जुगाराच्या बैठका झाल्याच नसत्या. जुगाराच्या या बादशहाना कोणाचा सपोर्ट आहे? याची देखील चौकशी व्हायला हवी. लोकांच्या जीविताशी खेळण्यापेक्षा अशा बेकायदेशीर धंद्यांवर हातोडा मारणे हेच हिताचे होईल, अन्यथा सरकारने लॉकडाऊन करून कोरोनाचा प्रसार देखील रोखता येणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा