सिंधुदुर्ग गॅस असोसिएशनची मागणी; जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांना निवेदन…
सावंतवाडी
कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या गॅस सिलेंडर एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना मोफत कोविड लस देण्यात यावी,अशी मागणी सिंधुदुर्ग गॅस सिलेंडर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे करण्यात आली.याबाबत त्यांना निवेदन देण्यात आले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,कोरोनाच्या सुरवाती पासून गॅस सिलेंडर वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव डोक्यात घालून काम केले आहे.मात्र आता पर्यंत शासनाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहेत.अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोफत लसीकरण सुरू आहे.मात्र गॅस वितार करणारे कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असून सुद्धा त्यांना मोफत लस देण्या बाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही.त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोफत लसीकरण करण्या संदर्भातप्रशासनाने विशेष मोहीम हाती घ्यावी.