You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नीट युजी परीक्षा केंद्र व्हावे यासाठी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचा पुढाकार..

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नीट युजी परीक्षा केंद्र व्हावे यासाठी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचा पुढाकार..

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नीट व युजी परीक्षा देणाऱ्या मुलांची परवड थांबण्यासाठी कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअमन उमेश गळवणकर यांनी पुढाकार घेऊन सदर परीक्षांचे केंद्र सिंधुदुर्गमध्ये व्हावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असून,  त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन सदर परीक्षा केंद्र सिंधुदुर्गात येण्याचे जवळजवळ निश्चित झालेले आहे.

युजी, नीट (UG,NEET ची)ची परीक्षा देण्यासाठी सिँधुदुर्गातील विद्यार्थ्याँना गोवा पुणे मुंबई कोल्हापूर अशा विविध भागात जावे लागत होते त्यामुळे पालक व विद्यार्थी यांची फार ससेहोलपट होत असे. हा त्रास दूर व्हावा यासाठी सिंधुदुर्गात NEET UG परीक्षा केंद्र यावं यासाठी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालय तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले होते. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालय चे संचालक माननीय डॉ. तात्याराव लहाने सरांनी सदर च्या निवेदनाची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या सचिवांना अशा स्वरूपाचे केंद्र सिंधुदुर्गात यावे याकरिता शिफारस केलेली आहे. तसेच माननीय जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सुद्धा संबंधित मंत्रालयाच्या सचिवांना सिंधुदुर्ग जिल्हा अशा स्वरूपाच्या केंद्रासाठी सज्ज असल्याचे पत्र दिले आहे.

आता या प्रक्रियेत माजी केंद्रीयमंत्री व भारत सरकार चे विद्यामन शेर्पा (G7and G20) माननीय श्री. सुरेश प्रभू यांनी केंद्रीयमंत्री श्री. रमेश पोखरियाल  यांना सिंधुदुर्गात NEET UG परीक्षा केंद्र यावे यासाठी आपले शिफारस पत्र दिलेले आहे. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी(NTA) चे चेअरमन प्रा.एम.एस. अनंथ यांना खासदार विनायक राऊत यांनी सुद्धा पत्र देऊन सदर केंद्र लवकरात लवकर सिंधुदुर्गमध्ये घेण्याच्या दृष्टीने पत्रही दिलेले आहे, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू साहेब, विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी आता या विषयात स्वतः लक्ष घातल्याने यंदाच्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात NEET UG परीक्षा केंद्र येणे आता जवळपास निश्चित झालेला आहे!

प्रतिक्रिया व्यक्त करा