चांदण्यातील भाभीकडे नक्की काय जादू आहे?…🤔
झटपट पैसे घेऊन मौजमजा करणे महिन्याला बिनव्याजी हफ्ता देणे हा भिशीचा सर्वसामान्य प्रकार. एकाचवेळी हजारो रुपये बिना कटकट आपल्याला मिळतात, त्यातून आपल्या अनेक गरजा, हौशी पुरवता येतात म्हणून कित्येकजण भिशी सुरू करतात. हजार, पाच हजार अशा मोठमोठ्या रकमांच्या भिशी आजकाल मार्केटमध्ये सुरू आहेत. त्यात मुख्यतः कामगारवर्ग जास्त गुंतलेला आहे. गवंडी, बांधकाम व्यावसायिक, फरशी फिटर असे व्यवसाय करणारे अनेकजण भिशीच्या झटपट पैशांमुळे भिशी उघडतात आणि एखादी फसवाफसवी करणारी व्यक्ती काहीकाळ इमानदारीने धंदा करते असे भासवून लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन रफुचक्कर होते.
कोकणाच्या नावावर सावंतवाडीत प्रसिद्ध असलेल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भानगडींनी गाजणाऱ्या कॉलनी मधील अशीच एक चांदण्या रात्रीत दिसणारी भाभी भिशी चालवते. भाभीवर तिच्या वागण्या बोलण्यामुळे अनेकांचा विश्वास. परप्रांतीय कामगार भाभीकडून काहीवेळा पैसे देखील घेतात. आपल्या आवाजात असलेला कणखरपणा आणि विश्वासार्हता यामुळे अनेक जणांनी भाभीकडे मोठमोठ्या भिशी उघडल्या होत्या. गेली काहिवर्षे भाभीने इमानदारीत भिशी चालवली त्यामुळे अनेकांचा विश्वास बसला होता.
वीस वीस जणांचा ग्रुप करून भाभी भिशी चालवते, परंतु भिशी उचलण्याचा मात्र पहिला मान भाभीचाच असतो ही भाभीची अट. चांदण्या रात्रीतल्या भाभीने अशाच भिशी सुरू करून लोकांकडून भिशीपोटी लाखो रुपये उचलून पोबारा केला आहे. सर्वसामान्य लोकांनाच नव्हे तर या चांदण्यातील भाभीने खाकी वर्दीतील रखवालदारांना देखील चुना लावल्याचे समजत आहे. सावंतवाडीसह दोडामार्ग, कुडाळ, झाराप येथील लोकांना सुद्धा गंडा घातल्याचे खात्रीशीर समजते.
चांदण्यातील या भाभीची चारचौघात दहशत आहे. मजबूत शरीरयष्टी असलेल्या या भाभीच्या गळाला रोज नवनवीन मोहरे लागत असतात. त्यामुळे या चांदण्यातील भाभीकडे नक्की काय जादू आहे? हेच समजत नाही.