You are currently viewing चार आठवड्यात महायुद्धाला सुरुवात होईल; रशियन तज्ज्ञानं दिला इशारा

चार आठवड्यात महायुद्धाला सुरुवात होईल; रशियन तज्ज्ञानं दिला इशारा

चार आठवड्यात महायुद्धाला सुरुवात होऊ शकते, अन् संपूर्ण जग आणि युरोप याचा साक्षीदार राहिल असा इशारावजा दावा रशियाचे लष्कर विशेषज्ञ पावेल फेलगेनहॉर यांनी केला आहे. मोठ्या प्रमाणात रशियाच्या सैनिकांनी दारुगोळ्यासह यूक्रेन पूर्व भागातील सीमेकडे कूच केल्याच्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर पावेल फेलगेनहॉर यांनी महायुद्धाचा इशारा दिला असून लवकरच संपूर्ण युरोप आणि जग याचं साक्षीदार ठरेल असा दावा केलाय.

रशियाच्या सैन्याच्या हालचालीबद्दल याआधीच पश्चिमेकडील देशाने याआधीच चिंता व्यक्त केली आहे. पावेल फेलगेनहॉर यांच्यामते यांची चिंता रास्त आहे. रशियाच्या वोरोनिश, रोस्तोव्ह आणि क्रॅस्नोदर या प्रदेशात लष्कराच्या हालचाली दिसून आल्या असून असत्यापित नवीन ठसे दिसून आले.

यामधील काही ठसे रशियाच्या डझनभर लष्करी हेलिकॉप्टर, टाक्या, गाड्या आणि इतर लष्करी वाहणांच्या हलचालीचे असल्याचं समोर आलं आहेत.

नक्सल अंकल प्लीज मेरे पापा को छोड दो..”, बेपत्ता जवानाच्या चिमुकलीची आर्त हाक

सध्या सुरु असलेल्या दोन देशांमधील तणावामुळे पॅन-युरोपियन युद्ध होण्याची शक्यता बळावतेय. पण हे जागतिक युद्ध नसेल. सध्या हे युद्ध होईल किंवा नाही याबाबत काहीच सांगता येणार नाही. यासाठी वाट पाहावी लागेल. पश्चिमेकडील देशांना याबाबत काय करायचं हेच माहीत नाही, असं पावेल फेलगेनहॉर यांनी रोझबॉल्ट आउटलेट या वृत्तवाहिनीला सांगितलं.

२०३६ पर्यंत पुतीन सत्ते राहणार, सविंधानात केला बदल

दोन देशांमदील तणाव वाढतच चालला असून तो सर्वोच्च पातळीवर पोहचला आहे. युक्रेनबाबतचा रशियाचा विचार आणि दावा याबाबतची मानसिकता बदलण्यासाठी एखाद्या मनोविश्लेषकांच्या पथकाची गरज असल्याचं मत फेल्गेनहॉर यांनी व्यक्त केलं आहे. दोन देशांमधील मानसिकतेचा प्रश्न मानसशास्त्रज्ञांना द्या. याबाबत मला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे का? वस्तुस्थिती तुमच्यासमोरच असून सर्व काही आधीच घडत आहे. धमक्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. पण प्रसारमाध्यमांमध्ये याची कोणताही चर्चा नाही. परंतु याची खूप चिन्हे दिसत आहेत, असेही पावेल फेलगेनहॉर म्हणाले.

या परिस्थितीमध्ये अमेरिकेनं युक्रेनला मदत करण्याचं अश्वासन दिलं आहे. अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यानं गुरुवारी खुलासा केला की, रशियामध्ये होत असलेल्या लष्करी हालचालींची आम्हाला माहिती होती. जर NATO ने युक्रेनला सैन्य पाठविण्याचा निर्णय घेतल्यास दुसरीकडे रशियानं ठोस पाऊलं उचलली आहेत, असेही पावेल फेलगेनहॉर म्हणाले.

रशियानं क्रीमियामध्ये तबब्ल ३२ हजार ७०० सैन्यदल तैनात केल्याचा आरोप युक्रेन यांनी लावला आहे. रशियन सैन्याच्या हालचालीवर प्रतिक्रिया देताना आपण कोणत्याही परिस्थितीसाठी देश तयार आहे, अशी प्रतिक्रिया युक्रेनचे कमांडर-इन-चीफ रुस्लान खोमचक यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा