You are currently viewing आधारवड

आधारवड

काठी बनूनी तुमची,
साथ दिली कायम.
वृद्धापकाळ आला जरी,
तुटणार नाही नियम.

धरला हात यौवनात,
सोबत कायम करण्यासाठी.
म्हातारपणी कसा सोडणार,
एकट्यानेच जगण्यासाठी.

जीव लावला होता तुम्ही,
माझ्या प्रेमळ स्वभावावर.
म्हणून जीव ओवाळून टाकला,
तुमच्या सारख्या नवऱ्यावर.

मुलं बाळं असती दूरदेशी,
नोकरीत त्यांच्या व्यस्त.
आपणही जगूया आपलं,
उतार वय निरोगी मस्त.

चिंता नाही आता कसली,
ना जगण्याची ना मरणाची.
हसत खेळत घालवू दिवस,
हिच इच्छा आता शेवटची.

(दिपी)✒️
दीपक पटेकर
सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा