नवी दिल्ली
नरेंद्र मोदी सरकारने बुधवारी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. या घोषणेमुळे नवीन रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील. यासह इतर बरेच फायदे देखील मिळतील. वास्तविक, केंद्र सरकारने अन्न प्रक्रिया क्षेत्रातील पीएलआय योजनेस मान्यता दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. या योजनेत 10 हजार 900 कोटींची तरतूद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्न उत्पादन क्षेत्रात देशाला अग्रणी स्थानावर आणणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय खाद्यपदार्थाच्या ब्रँडला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.
शेतकर्यांना कसा मिळणार लाभ?
जर एखादा शेतकरी आंबा लागवड करीत असेल तर तो या योजनेंतर्गत आंब्यापासून बनणाऱ्या उत्पादनांसाठी प्रक्रिया युनिट्स लावू शकतो. सरकार शेतकर्यांच्या उद्योगास चालना व प्रोत्साहन देण्याचे काम करेल. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि त्याच वेळी शेतकरी त्यातून आपले उत्पन्न वाढवू शकेल.