सडा प्राजक्ताचा,
रोज अंगणी पडतो.
पहाटेच्या वाऱ्यासवे,
गंध आसमंती उडतो.
बहरलेला पारिजात,
डाव झाडाखाली मांडतो.
जणू चांदणं आभाळीचं,
नभ धरणीवर सांडतो.
पांढरे गोजिरे फुल,
दंड केशरी त्यास.
गुंफता माळ फुलांची,
दिसे रचना खास.
आयुष्य एक दिवसाचे,
हसत हसत जगतो.
बिलगून धरणीस जाता,
सुख धरणीसही देतो.
अंगणी माझ्या रुजुनी,
सडा शेजारी सांडतो.
पोटच्या पोरी सारखं,
घर दुसऱ्याचं सजवतो.
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६