You are currently viewing व्यापार्‍यांवर लादण्यात आलेल्या कोरोना चाचणीच्या सक्तीवर पुर्नविचार करावा – पुंडलिक दळवी

व्यापार्‍यांवर लादण्यात आलेल्या कोरोना चाचणीच्या सक्तीवर पुर्नविचार करावा – पुंडलिक दळवी

व्यापार्‍यांसह फिरते विक्रेत्यांना मोफत लसीकरण करा, राष्ट्रवादीची मागणी…

सावंतवाडी

कोरोनाच्या काळात अधिकारी आणि पोलिस यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत ग्राहकांना सेवा देणार्‍या व्यापार्‍यांना जिल्हा प्रशासनाकडुन कोरोना चाचणीची करण्यात आलेली सक्ती योग्य नाही.त्यामुळे याबाबत पुर्नविचार करण्यात यावा,तसेच व्यापारी आणि आठवडा बाजारात येणार्‍या फीरत्या विक्रेत्यांना मोफत लसीकरण करण्यात यावे,अशी मागणी सिंधुदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी व्यापार सेलचे अध्यक्ष तथा सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा प्रशासनाकडुन दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रत्येक व्यापार्‍याने कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे.परंतू एकदा केलेल्या चाचणीची मुदत केवळ तीन दिवसच असते.त्यामुळे पुन्हा पुन्हा तपासणी करणे शक्य होणार नाही.त्यामुळे याबाबत प्रशासनाने योग्य तो विचार करावा,तसेच व्यापाऱ्यांना व फिरत्या विक्रेत्यांना मोफत कोरोना लसीकरण करण्यात यावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा