You are currently viewing बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील हाई स्पीड ट्रॉलरवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई…

बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील हाई स्पीड ट्रॉलरवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई…

निवती समुद्रात शीतल गस्ती नौकेची कारवाई

मालवण

निवतीच्या समुद्रात रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीररित्या मासेमारी करणाऱ्या उडपी कर्नाटक येथील हायस्पीड ट्रॉलर मालवणच्या मस्य व्यवसाय विभागाच्या शीतल या गस्ती नौकेने पकडला. पकडण्यात आलेल्या या बोटींवर लाखो रुपयांची मासळी सापडली असून त्या मासळीचा लिलाव सुरू होता. मालवणच्या मत्स्य विभागाची शीतल’ ही गस्ती नौका घेऊन काल शनिवारी रात्रौ दहा वाजता अतिरिक्त सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रवींद्र मालवणकर यांच्या नेतृत्वाखालील दिपेश मायबा, सागर परब, स्वप्नील सावजी, चंद्रकांत कुबल हे सागरी सुरक्षा आणि पोलीस कर्मचारी संदिप सरकुंडे यांचे पथक निघाले.

रविवारी मध्यरात्री निवतीच्या समुद्रात परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स १८ वावामध्ये मच्छिमारी करताना आढळून आले. यावेळी गस्ती नौकेने त्यांना पकडण्यासाठी चाल केली असता काही ट्रॉलर पळून गेले त्यातील मच्छिमारी करणारा उडपी येथील स्मिता आर यांच्या मालकीचा रिद्धी सिद्धी नावाचा हायस्पीड ट्रॉलर पकडला आहे. या ट्रॉलरवर रावस, म्हाकुल, राणी, वाघटी, बळे बांगडे, पेडवे व इतर मासळी होती या मासळीची लिलाव प्रक्रिया सकाळी सुरू होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा