मराठा समाजाला २०२०- २०२१ मधे आरक्षण नाही.
मुंबई / प्रतिनिधी :-
मराठा समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकर आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास अंतिम स्थगिती दिली आहे.
या प्रकरणात विचार करण्यासाठी मोठ्या खंडपिठाची निर्मिती केली जाईल असे सर न्यायाधीश एस. ए .बोबडे यांनी म्हटले आहे.
या दरम्यान सुप्रीम कोर्ट ह्या प्रकरणातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील मराठा समाज नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी सामाजिक तसे शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या वर्गांसाठी नियम २०१८ मध्ये १६ टक्के आरक्षण करण्यात आले होते. ते आरक्षण अजून पर्यंत लागू करण्यात आले नाही.
महाराष्ट्र मराठा समाजातील नोकरीत १२ टक्के तर शिक्षणात १३ टक्के असे आरक्षण देण्याचे ठरवले होते मात्र हे आरक्षण राज्यातील एकूण आरक्षणा च्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. म्हणून हे आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.