You are currently viewing एक सत्या – सत्यवान यशवंत रेडकर – ध्येय वेडा माणूस.

एक सत्या – सत्यवान यशवंत रेडकर – ध्येय वेडा माणूस.

स्वतः शासकीय उच्च पदावर अधिकारी असणारा एक तरुण शासकीय कर्मचारी -अधिकाऱ्यांचे गाव हि संकल्पना राबवितोय ते सुद्धा विनाशुल्क. त्यामुळेच तो सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे.सध्या गाव, तालुके मजल दरमजल करीत भटकत विद्यार्थ्यांना व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन करीत आहे.आपण त्याकाळी परिस्थितीवर मात करीत एका उच्च पदावर पोहोचलो तसा इतरांना त्रास होऊ नये.असे सत्यवान सांगतो. नव्या पिढीसाठी शैक्षणिक तसेच स्पर्धा परीक्षांची मनातील भीती दूर व्हावी यासाठी अक्षरशा त्याने ध्यास लावून घेतला आहे.असे किती तरी जण असतील.पण सत्यवान सारखा क्वचित एखादाच. म्हणूनच कोकणानेच नव्हेतर उर्वरित महाराष्ट्राने सुद्धा त्याच्या या कार्याची दखल घेण्यास भाग पाडले आहे.गरिबी काय असते हे त्याने या पूर्वीच अनुभवलेले आहे.मागे दोन भावंड,आई गृहिणी,वडील प्रारंभी शासकीय नोकरीत शिपाई या पदावर व नंतर वरिष्ठ लिपिक म्हणून निवृत्त.त्याकाळी शासकीय कर्मचाऱ्याला अगदी तुटपुंजा पगार. याच परिस्थितीच्या अनुभवातून सत्या एका उच्च पदावर कार्यरत असून सुद्धा निःस्वार्थी पणे आपले ज्ञानार्जनाचे कार्य अविरत पणे करीत आहे.आम्हा कोकणवासीयांना त्याचा सार्थ अभिमान आहे.आपल्याकडून हे सेवाभावी कार्य असेच अखंडपणे सुरु राहो आपल्या शासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांचे गाव हि संकल्पना यशस्वी होवो या आमच्या कडून शुभेच्छा. 💐🙏 सत्या…अर्थात श्री सत्यवान यशवंत रेडकर.
विद्यार्थ्यानो यशवंत
व्हा..गुणवंत व्हा.

रघुवीर सखाराम चव्हाण
मो :९९६९०३९९८१

प्रतिक्रिया व्यक्त करा