You are currently viewing पंचायत समिती सावंतवाडी सेस फंडातून पाचवीसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा

पंचायत समिती सावंतवाडी सेस फंडातून पाचवीसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा

बांदा

गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती सावंतवाडी यांच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील इयत्ता पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप कळावे यासाठी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक केंद्रशाळा पातळीवर आयोजित करण्यात आली होती. बांदा येथील परीक्षा केंद्रावर जिल्हा परिषद सदस्या सौ. श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते या परीक्षेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बांदा केंद्राचे संचालक केंद्रप्रमुख संदीप गवस, बांदा मुख्याध्यापक सरोज नाईक, जे .डी .पाटील, मालू लांबर, शुभेच्छा सावंत, उर्मिला मौर्ये, लुईजा गोल्सलवीस आदि शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्वेता कोरगावकर यांनी विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यात स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनावे असे सांगून पंचायत समिती सावंतवाडी मार्फत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे. डी. पाटील तर आभार केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा