You are currently viewing ‘रात्रीस खेळ चाले’ च्या वादावर अखेर पडदा !

‘रात्रीस खेळ चाले’ च्या वादावर अखेर पडदा !

कुडाळ

गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सातत्याने ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या संदर्भात कुडाळ पोलीस ठाणे तसेच अन्य ठिकाणी निवेदन देत आहेत त्यामुळे या मालिकेतील निर्माता आणि युवक पदाधिकारी यांच्यामध्ये वाद  शिगेला पोचला होता आणि या वादाचे पडसाद दोन दिवसांपूर्वी मालिकेच्या आकेरी येथील सेट वर दिसून आले.

या मालिकेच्या प्रमोशनसाठी ठिक-ठिकाणी भिंती रंगविल्या गेल्या हे  विद्रुपीकरण चुकीच्या पद्धतीने केले गेले तसेच काही स्थानिक कलावंतांना म्हणून सहभागी कलावंतांचे मानधन दिले नाही ते मानधन द्या अशा प्रकारच्या मागण्या पदाधिकाऱ्यांनी केल्या निर्माता सुनील भोसले म्हणाले की यापूर्वी या जिल्ह्याचे चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून मी सातत्याने येत आहे हे ठिकाणच्या स्थानिक कलावंतांना घेऊन आम्ही या ठिकाणचे चित्रपट किंवा मालिका असतील ते करतो असे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक पदाधिकारी व रात्रीस खेळ चाले या मालिकेतील वादांवर पडदा पडला.

यावेळी या मालिकेचे कलावंत गावडे तसेच राष्ट्रवादीचे काका कुडाळकर प्रफुल्ल सुद्रिक ,बाळा कनयाळकर, भास्कर परब ,पिळणकर ,ॲड. हितेश कुडाळकर, प्रशांत पाताडे ,सर्वेश पावस्कर राजू धारपवार ,सनी मोरे, इंजीलो पिंटो, अमर धोत्रे ,प्रतिक सावांत, सुमेध सावंत, राजेंद्र कोठावळे अभिजित पवार व अन्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा