“सिंधुदुर्गचे वैभव सर्वसामान्य जनतेचे आमदार वैभव नाईकच”
– सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांचे गौरवोद्गार
“जनतेची सेवा अविरतपणे करतच राहणार”
– आमदार वैभव नाईक यांची ग्वाही
शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने शिवसेना शाखेत शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या 46 व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध संस्थांना व शाळांना थर्मलगन व ऑक्सिमिटर मशीनचे वाटप देखील करण्यात आले.
“शिवसेनेचे कुडाळ मालवण मतदारसंघाचे डॅशिंग आमदार वैभव नाईक म्हणजे सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज. जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढणारे नेतृत्व म्हणजे वैभव नाईक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद लाभलेले वैभव नाईक हे कार्यतत्पर आमदार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच युवासेनाप्रमूख पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंचा देखील वैभव नाईक यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास आहे. वैभव नाईक सदैव शिवसैनिकांना घेऊन जनतेसोबतच असतात. सर्वसामान्य जनतेसाठी लढणारा सिंधुदुर्गचा शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणजे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईकच,” असे गौरवोद्गार अरुणभाई दुधवडकर यांनी याप्रसंगी काढले.
“आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रम आणि व कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात यावा या संदर्भात आम्ही सर्वांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार माझ्या सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रम आयोजित केले आहेत. या वाढदिवसाच्या आशीर्वादामुळेच भविष्यात सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत राहणार,” असे प्रतिपादन शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी यावेळी केले.
यावेळी 46 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कणकवली तालुक्यातील स्वयंभू मंदिर शहर, भालचंद्र महाराज आश्रम, गणेश मंदिर एसटी वर्कशॉप, गजानन महाराज मठ कलमठ, महापुरुष मंदिर कणकवली, प्राथमिक शाळा तिवरे, बाल शिवाजी इंग्लिश स्कूल, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे, आर्यादुर्गा मंदिर वागदे, फलाहारी महाराज मंदिर कणकवली, सेंट उर्सुला स्कूल वरवडे, कणकवली कॉलेज कणकवली या सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांसाठी आरोग्य तपासण्यासाठी थर्मल मशीन व ऑक्सिमिटरचे वाटप आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले.
या वाढदिवस विशेष शुभारंभ कार्यक्रमाला कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, बाळा भिसे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड हर्षद गावडे, राजु राणे, राजु राठोड, अवधूत मालंडकर, आनंद ठाकूर, विलास कोरगावकर, अरविंद राणे, अनुप वारंग, आनंद आचरेकर, राजु रावराणे, प्रसाद अंधारी, विलास गुडेकर, निसार शेख, दादा भोगले, सत्यवान राणे, ललित घाडीगांवकर, धनंजय सावंत, किरण वर्दम, भाई साटम, केतन सावंत, दिपक दळवी, सिद्धेश राणे, नासिर खान, आसिफ निशानदार, समिर सावंत, बंटी वरुणकर, महेश देसाई, निलेश परब, कैलास घाडीगांवकर, पराग म्हापसेकर, प्रशांत राणे, रिमेश चव्हाण, प्रमोद पिळणकर, राजु कोरगावकर, भुषण परुळेकर, वेंकटेश वारंग, विठोबा कोरगावकर, सचिन आचरेकर, समिर परब, प्रतिक्षा साटम, कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर, सोनाली मेस्त्री, वागदे सरपंच पूजा घाडीगांवकर, तिवरे सरपंच लतिका म्हाडेश्वर, रश्मी बाणे, धनश्री मेस्त्री, शोभा बागवे, जैबा कुरेशी, मिनल म्हसकर, संजना साटम आदी उपस्थित होते.
यावेळी 46 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कणकवली तालुक्यातील स्वयंभू मंदिर, भालचंद्र महाराज आश्रम, गणेश मंदिर एसटी वर्कशॉप, गजानन महाराज मठ कलमठ, महापुरुष मंदिर कणकवली, प्राथमिक शाळा तिवरे, बाल शिवाजी इंग्लिश स्कूल, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे, आर्यादुर्गा मंदिर वागदे, फलाहारी महाराज मंदिर कणकवली, सेंट उर्सुला स्कूल वरवडे, कणकवली कॉलेज कणकवली या सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांसाठी आरोग्य तपासण्यासाठी थर्मल मशीन व ऑक्सिमिटरचे वाटप आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले.
हा वाढदिवसाचा सामाजिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजु शेट्ये, हर्षद गावडे, सुशांत नाईक, संदेश पटेल, राजु राणे यांनी विशेष मेहनत घेतली.