सावंतवाडी
धुळीचं साम्राज्य निर्माण झालेल्या सावंतवाडी बसस्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी याआधी धडक देत स्थानकातील गैरसोयी दुर करण्याची मागणी केली होती. मात्र, आगार प्रमुख वैभव पडोळे याकडे सपशेल दुर्लक्ष करत सुट्टीवर गेले. यामुळे संतप्त झालेल्या पुंडलिक दळवी यांनी वरिष्ठांच लक्ष वेधल. यानंतर कनिष्ठ अभियंता गिरिजा पाटील परिस्थितीची पहाणी करण्यासाठी आज सावंतवाडीत आल्या. आगार प्रमुखांना सांगुन देखील काम न झाल्यानं संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना संपूर्ण बसस्थानकाची दुर्दशा दाखवली. प्रवाशांच्या बसण्याच्या जागेवरील धुळीच साम्राज्य, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, हिरकणी केंद्राची दुरावस्था, पोलीस चौकी दुरावस्था आदींवरून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानक प्रमुख विशाल शेवाळे यांना कनिष्ठ अभियंतांसमोरच सुनावले. दरम्यान, कंट्रोल रूममधून गाड्यांच अनांवसिंग होत नसल्याची तक्रार प्रवाशांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. याची शहानिशा करण्यासाठी कंट्रोल रूमकडे राष्ट्रवादीचे पदाधिकारी गेले असता एसटीचे संतोष लाखे यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणखीनच संतापले. या प्रकारामुळे डेपोतील वातावरण काही काळ तापलं होतं. बसस्थानकाची पहाणी केल्यानंतर आजच्या आज संपूर्ण परिस्थिती सुधारेल अशी ग्वाही कनिष्ठ अभियंता गिरिजा पाटील यांनी दिली. तर आगार प्रमुख, स्थानक प्रमुखांच्या कामाचा रिपोर्ट वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गैरसोयी दुर न होता आणखीनच वाढल्यानं आगार प्रमुखांनी सुट्टी टाकत आधीच पळ काढला असं मत पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले. तक्ष आगार प्रमुख, स्थानक प्रमुखांच्या अनागोंदी कारभाराबाबत तीव्र निषेध केला. राष्ट्रवादीकडून शेवटचा इशारा देण्यात येत असून जर आजचा दिवसांत परिस्थिती बदलली नाही, तर उद्या जे काही होईल त्याला एसटी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिला. यावेळी शहराध्यक्ष देवा टेंमकर, आसिफ शेख, इफ्तिकार राजगुरू, राजू धारपवार यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते