You are currently viewing तुळस-जैतिर मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉगसाठी ५ लाख…

तुळस-जैतिर मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉगसाठी ५ लाख…

आमदार दिपक केसरकर यांच्याकडून निधी; भूमिपूजन संपन्न…

वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील श्री देव जैतिर मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉग साठी शिवसेना तालुका प्रमुख बाळु परब यांच्या प्रयत्नातून आम. दिपक केसरकर यांनी ५ लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला.
या कामाचे भुमिपुजन सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी देवस्थानचे मानकरी अध्यक्ष अनिल परब, गावचे सरपंच शंकर घारे, उपसरपंच सुशिल परब, मानकरी बाबा परब, ग्रा.प.सदस्य तथा माजी उपसरपंच जयवंत तुळसकर, माजी सरपंच आपा परब, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सेक्रेटरी मकरंद परब, ग्रा. प सदस्य शेखर तुळसकर, सोनु आरमारकर, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप परब, शिवसेना विभाग प्रमुख संजय परब, रामचंद्र शिरोडकर, राजन तुळसकर, दाजी तुळसकर, राधाकृष्ण परब, सगुण परब, संतु कोरगावकर, ठेकेदार चिंतामणी तांबोसकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा