You are currently viewing माझे कुटुंब माझी जबाबदारी

माझे कुटुंब माझी जबाबदारी

माझे कुटुंब माझी जबाबदारी….मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे काल झालेल्या विधान सभेत निवेदन

मुंबई / प्रतिनिधी :-

आजपर्यंत आरोग्य हा विषय मागे पडला होता. करोनाच्या संकटातून बऱ्याच काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या असे उध्दव ठाकरे म्हणाले. सगळ्या गोष्टी कायद्याने करता येत नाही. जनतेला त्यांचे हित कशात आहे, हे नीटपणे सांगू शकलो, राज्यात तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क निर्माण केले. जिल्ह्यांमध्ये देखील असे टास्क फोर्स नेमले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने करोनाचे संकट लवकर जाणार नाही, असा इशारा दिला आहे. यापुढेही येणाऱ्या महामारीला सामोरे जावे लागेल, असे सांगितले आहे. माझे कुटुंब माझी जवाबदारी मोहीम अंतर्गत १५ महत्त्वाचे मुद्दे उध्दव ठाकरे यांनी मांडले आहेत.राज्यभरात २ टप्प्यात ही मोहीम राबवली जाईल असे ते म्हणाले.

त्यातील १५ महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.

१. कोरोना विषाणू ला रोखण्याची मोहीम आणि गतप्रवर्तक , स्वयंसेविका, वैद्यकीय सहायक या क्षेत्रातील सर्वांच्या सहभागाने एक राज्यव्यापी मोठी मोहीम

२. पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोंबर पर्यंत घरोघरी आरोग्य विषयक चौकशी केली जाईल.तपासणी नव्हे.

३. पहिल्या फेरीचा कालावधी हा २२ दिवसांचा असणार आहे तर दुसरा १२ दिवसांचा असेल.

४. दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोंबर ते २४ ऑक्टोंबर या कालावधीत २वेळा स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेट देतील.

५. ही मोहीम सर्व महानगरपालिका ,नगरपालिका,ग्रामपंचायत आणि नगरपंचायत इत्यादी ठिकाणी राबवली जाऊन येतील प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जाईल.

६. या मध्ये घरातील कुटुंबाच्या आरोग्या विषयी जाणून घेतले जाईल.हाय रिस्क आजार हृदय विकार ,मधुमेह ,किडनी ,लठ्ठपणा या सारख्या आजार आणि इतर आजार असणारे व्यक्ती निदर्शनात येतील.या अनुषंगाने इतर आरोग्य विषयक माहिती ही ध्यानात येणार आहे.

७. नगरपालिका आणि महानगर पालिका मध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भागामध्ये याचे नियोजन करतील.

८. शासकीय कर्मचाऱ्यांचे आणि स्वयंसेवेचे एक पथक असेल.एका दिवसात ५० घराना भेट देण्यात येईल.हे पथक सरपंच ,नगरसेवक निश्चित करतील.

९. सरपंच आणि नगर एवकांवर ही जबाबदारी असेल.

१०.ही मोहीम महिला विकास बालकल्याण आयोग ,नगरसेवक आणि सामजिक आरोग्य मार्फत चालू केली जाईल.

११. आरोग्य विषाई जनगागृती साठी पालक,विद्यार्थी,सामान्य व्यक्तींसाठी निबंध स्पर्धा ,संदेश स्पर्धा चे आयोजन केले जाईल. विजेत्यांना पारितोषिक ही देण्यात येतील.विविध संस्थांनाही यात भाग घेता येईल.

१२. जिल्हास्तर आणि ग्रामीण भाग असे दोन विभाग असतील तर प्रत्येक विभागात पहिल्या ३ संस्था निवडल्या जातील त्यांना गुणाच्या आधारे बक्षीस दिले जातील.

१३.पालक विद्यार्थी यांनाही बक्षीस दिले जातील.

१४.गावोगाव च्या स्वयंसेवी संस्था ,दक्षता समिती यांना या मोहिमेस मदत करण्याचे आव्हाहन केले आहे.

१५.आपला महाराष्ट्र यामुळे देशातील आदर्श राज्य ठरेल. जिथे पुढाकार घेवून संकटांवर मात केलेली असेल.

मी आपणास या मोहिमे मधे सहभागी होऊन यशस्वी करण्याचे आश्वासन देतो असे उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा